इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालचा शतकी तडाखा! WTC मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

Yashasvi Jaiswal scored 2nd test hundred against England: इंग्लंड विरुद्ध भारताच्या दुस-या कसोटीमध्ये यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) धमाका केला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत दमदार शतक झळकावले आहे.

षटकारासह आपले शतक पूर्ण केले
यशस्वी जैस्वालने  षटकारासह कसोटीतील दुसरे शतक (IND VS ENG ) पूर्ण केले. यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात केली होती. मात्र रोहित शर्माच्या रूपाने भारताची पहिली विकेट 40 धावांवर पडली. पहिल्या सामन्यात यशस्वीचे शतक हुकले होते. पहिल्या डावात 80 धावांवर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

151 चेंडूत शतक ठोकले
मात्र आज यशस्वीने 151 चेंडूत सहा षटकारांसह शतक झळकावले. यशस्वीने तिसऱ्या सत्रापर्यंत 243 चेंडूत 67.90च्या स्ट्राईक रेटने 17 चौकार आणि 4 षटकारांसह 165 धावा केल्या आहेत. आपल्या खेळीदरम्यान त्याने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारीही केली आहे. तसेच रजत पाटीदारसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली आहे.

कसोटी कारकिर्दीत 500 धावा पूर्ण केल्या
या खेळीसह यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 धावा पूर्ण केल्या आहेत. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या या भारतीय फलंदाजाने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 62.77 च्या स्ट्राइक रेटने 565 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 171 ही त्याची वेस्ट इंडिजविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

WTC 2023-25 ​​मध्ये दुसरे शतक
विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​ ​​दरम्यान एकापेक्षा जास्त शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी पदार्पणाच्या सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची तुफानी खेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या –

Valentine Day | या डेस्टिनेशनवर तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करा, प्रेमाचा दिवस खास होईल

Ivan Lendle House | 10 बेडरूम, 15 बाथरूम… दिग्गज खेळाडूने घर विकून 100 कोटी रुपये कमावले!

Mumbai Congress | राज्यात कॉंग्रेसला गळती झाली सुरु; पहिला आमदार फुटला,अजितदादा गटाच्या गळाला लागला