१६ वा ऑनलाईन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारीपासून 

पुणेः- १६ वा ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारीपासून सुरू होत असून या महोत्सवानिमित्त यंदाचा ‘वसुंधरा सन्मान’ पाँडिचेरी येथील ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनचे संस्थापक कृष्णा मॅकेंझी यांना, ‘पर्यावरण पत्रकारीता’ सन्मान गुजरात मधील भूज येथील अनुभवी पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार रोनक गज्जर यांना, तर ‘फिल्म मेकर’ पुरस्कार डि. डब्ल्यु. इको इंडिया या पर्यावरणविषयक व्हिज्युअल (दृकश्राव्य) मॅगझीनला यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, महोत्सवाचे ‘फॅसिलीटेटर’ आनंद चितळे, ‘क्यूरेटर’ डॉ. गुरूदास नूलकर आणि ‘महोत्सव संयोजक’ वीरेंद्र चित्राव (Aarti Kirloskar, Managing Director of Kirloskar Oil Engines Ltd. Gauri Kirloskar, President of the festival Rajendra Deshpande, ‘Facilitator’ of the festival Anand Chitale, ‘Curator’ Dr. Gurudas Noolkar and ‘Festival Organizer’ Virendra Chitrao) यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शुक्रवार दिनांक २० जानेवारी पासून सोमवार दिनांक २३ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या ऑनलाईन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जगभरातील श्रोत्यांसाठी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विनामूल्य ऑनलाइन प्रसारित केला जाणार असून त्यासाठी bit.ly/kviff23 या लिंकव्दारे नोंदणी करणे  आवश्यक आहे. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (KVIFF) १५ वर्षांपूर्वी किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांनी सुरू केला. पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन, ऊर्जा, हवा, पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम आणि चित्रपट यांना स्थान देणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा एकमेवाद्वितीय असा महोत्सव आहे.

भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा या विषयावर लक्ष केंद्रित करणारा पहिला महोत्सव असेल. ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा या महोत्सवाचा विषय आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ ते दुपारी २.३० अशा या वेळेत महोत्सवाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७.०० ते रात्री १०.३० या वेळेत महोत्सवाचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावर्षी भारतातील २० शहारात हा महोत्सव ऑफलाइन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, दृक्श्राव्य व्याख्याने आणि समारोप समारंभ (Opening ceremony, expert guidance, photo exhibition, Vasundhara Samman, seminars, nature talks, films, audio-visual lectures and closing ceremony) असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.

महोत्सवामध्ये १०० पेक्षा जास्त फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार असून त्यांना महोत्सवाचे सल्लागार डॉ. गुरुदास नूलकर, संजय पाटील, डॉ. राजश्री जोशी, डॉ. मंदार दातार, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, स्वप्नील कुंभोजकर आणि आरती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या महोत्सवा दरम्यान पत्रकार संघ नवी पेठ, पुणे येथे रोज दुपारी २.०० ते दुपारी ४.०० या वेळेत पत्रकार आणि विशेष आमंत्रितांसाठी फिल्म्स प्रदर्शन आणि तज्ञांशी संवादाचे कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित करण्यात येणार असून ‘ एंचॅटिंग इंडिया’ (Enchanting India) हा यंदाच्या छायाचित्र प्रदर्शनाचा विषय आहे. या प्रदर्शनासाठी भारतातील अनेक प्रसिध्द छायाचित्रकारांना निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये ध्रितीमन मुखर्जी, गौतम पांडे, सचिन राय, गणेश शंकर, गिरी कावळे, कल्याण वर्मा, सुधीर शिवराम, दिनेश कुंबळे, संदेश कादूर, धर्मेंद्र खंडाल, शिवशंकर बांगर, संग्राम गोवर्धने, जेनी मारीया, शांतनू प्रसाद, रिपन बिस्वास, संदिप धुमाळ, सुहास नलावडे, गणेश बागुल, अजय सोनारीकर, डॉ. आनंद बोरा, डॉ. व्यंकटेश मेतन, मंदार घुमरे, रोनक गज्जर, शेखर नानिवडेकर, योगेश पुराणिक, अनिश अंधेरीया, विकास यादव, प्रशांत खारोटे(Dhritiman Mukherjee, Gautam Pandey, Sachin Rai, Ganesh Shankar, Giri Kawle, Kalyan Verma, Sudhir Shivram, Dinesh Kumble, Sandesh Kadur, Dharmendra Khandal, Shivshankar Bangar, Sangram Gowardene, Jenny Maria, Shantanu Prasad, Ripan Biswas, Sandeep Dhumal, Sudhas Nalavde , Ganesh Bagul, Ajay Sonarikar, Dr. Anand Bora, Dr. Venkatesh Metan, Mandar Ghumre, Ronak Gajjar, Shekhar Nanivadekar, Yogesh Puranik, Anish Andheria, Vikas Yadav, Prashant Kharote)  यांची दर्जेदार छायाचित्रे पहाणे हा एक अनोखा आनंद असणार आहे. महोत्सवात चारही दिवस हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

सन्मानार्थींचा परिचय
कृष्णा मॅकेंझी, (यू.के. + ऑरोव्हिल, तामिळनाडू) : (वसुंधरा सन्मान)(Krishna McKenzie, (UK + Auroville, Tamil Nadu) : (Vasundhara Samman)
कृष्णा मॅकेंझी हे केवळ एक शेतकरी, एक संगीतकार, एक शिक्षणतज्ज्ञ आणि एक अभिनेताच नाही तर भारतातील पाँडिचेरी येथील ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनचे संस्थापक देखील आहेत. जपानी झेनमास्टर आणि शेतकरी मासानोबू फुकुओका यांच्या तत्त्वज्ञानाने ते प्रेरित आहेत. गेल्या २३ वर्षांपासून ऑरोविलमध्ये राहून पर्माकल्चर (शाश्वत कृषी इकोसिस्टीम), संगीत, समुदायिक आणि स्थानिक स्तरावर अन्नाची उपलब्धता यां एकत्रितपणे सामाजिक बदलाचे माध्यम म्हणून वापरत आहेत. शिक्षणाला ते आपल्या कामाचा मुख्य पैलू मानतात. १९९३ मध्ये यूके मधील जे. कृष्णमूर्ती स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते ऑरोविलला आले. शाळेत भाजीपाला जोपासत असताना अभिनय, संगीत, जीवशास्त्र, फ्रेंच आणि जॅझ गिटारचाही अभ्यास त्यांनी केला.अन्नपूर्णा फार्ममध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करताना, त्यांनी ऑरोविलमध्ये शेती आणि पुनर्वनीकरण प्रकल्पात ५०-एकरचे अरण्य स्थापन करण्यात हातभार लावला. सन १९९६ मध्ये आपण स्थानिक अन्न, पर्माकल्चर आणि नैसर्गिक शेतीशी निगडीत एक सर्जनशील समुदाय तयार करण्यासाठी सॉलिट्यूड फार्मचालू केले. हे फार्म एक सेंद्रिय रेस्टॉरंट चालविते आणि शेतात उगविलेल्या ताज्या पदार्थांमधून रोजचे जेवण बनते. सॉलिट्यूड एक कम्युनिटी सपोर्टेड अॅग्रीकल्चर (CSA) प्रोग्राम देखील चालविते, ज्याद्वारे सदस्यांना दर आठवड्याला ताज्या फळांच्या आणि भाज्यांच्या टोपल्या मिळतात.

त्यांच्या कार्याला सामाजिक शेती असे संबोधले जाते आणि स्थानिक अन्नाचा पर्यावरण, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाज यांच्यातील संबंधांवर संशोधनाचा हा विषय आहे. २००६ मध्ये त्यांनी इमर्जन्स नावाच्या बँडची स्थापना केली आणि या बँडने यूकेमधील ग्लास्टनबरी महोत्सव, वॉशिंग्टन डी.सी. मधील मॅक्सिमम इंडिया फेस्टिव्हल आणि मुंबईत ब्लू फ्रॉग येथे कार्यक्रम सादर केले आहेत. शिवाय, दरवर्षी सॉलिट्यूड येथे लाईव्हली अप युवर अर्थ (LUYE) या नावाने इको म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्याची योजना ते आखत आहेत. त्यांनी तरुणपणी मोलियर, शेक्सपियर, ब्रेख्त, पिंटर, नील सायमन यांच्या आणि यासारख्या अजून विविध नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

रोनक गज्जर (भूज, गुजरात): इकोजर्नालिस्ट (पर्यावरण पत्रकार) Ronak Gajjar (Bhuj, Gujarat): Ecojournalist
रोनक गज्जर हे गुजरात मधील भूज येथील अनुभवी पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार आहेत आणि २००७ पासून दिव्य भास्करसाठी काम करत आहेत. वन्यजीव, पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवर विस्तृत पार्श्वभूमीसह नेत्रसुखददृश्य (व्हिज्युअल), लिखित आणि ऑनलाइन माहिती प्रसारित करतात. बातमी मूल्य वाटणाऱ्या कथांच्या प्रकल्पांच्या संशोधन, तपास आणि निर्मितीमध्ये स्वतःला झोकून देणे त्यांना आवडते. एक जिज्ञासू आणि सक्रिय पत्रकार असल्याने त्यांना नवीनतम डिजिटल मीडिया ट्रेंडमध्ये स्वारस्य आहे आणि ऑनलाइन कथनाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल उत्कटता आहे.केवळ गुजराती भाषेतच नाही तर हिंदीतही लेखन केल्याने ते पर्यावरणीय पत्रकारितेत आगळेवेगळे काम करत आहेत. कारण स्थानिक भाषांमध्ये ते माहिती प्रसारित करतात आणि त्याचमुळे केवळ इंग्रजीमध्ये अशा विषयांवर लिहिणाऱ्यांच्या तुलनेत ते लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहेत.त्यांची एक महत्त्वाची ब्रेकिंग स्टोरी म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड अर्थात माळढोक पक्ष्याचा शेवटचा नर गुजरातमधून कसा बेपत्ता झाला आणि राज्यात ग्रेट इंडियन बस्टर्ड्स च्या फक्त माद्या उरल्या ह्या बद्दलचा लेख. दोन वर्षांपासून त्यांचा, गुजराती भाषेमधला रविवारचा कुदरत नी केडी (निसर्गाच्या मार्गावर) हा पहिलाच असा वृत्तपत्रस्तंभ होता ज्याने वन्यजीवांबद्दलच्या गैरसमजुतींचा / मिथकांचा पर्दाफाश केला आणि बिबट्या, कॅराकल ( शशकर्ण) हा मार्जारकुलीन प्राणी, आणि हनीबॅजर (मध खाणारा बिज्जू) यांसारख्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणाचा संदेश प्रसारित केला. परिसंस्था आणि अन्नसाखळीतील त्यांचे महत्त्व आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या कार्याचे यात मोठे योगदान आहे. त्यांचा सर्वाधिक व्हायरल झालेला लेख पक्ष्यांना गाठ्या (फरसाण ) आणि तेलकट पदार्थ खाऊ न घालण्याबद्दल होता – लेखाचे शीर्षक होते. पक्ष्यांना खायला देऊन तुम्ही पाप करत आहात, पुण्य नव्हे हा त्यांचा संदेश गुजरातमधील हजारो लोकांच्या मनाला भावला आणि लोकांनी पक्ष्यांना तेलकट आणि जंक फूड देणे बंद केले.

DW-इको इंडीया (बर्लिन, जर्मनी) : फिल्म मेकर (चित्रपटकर्ता)DW-Eco India (Berlin, Germany) : Filmmaker

DW किंवा Deutsche Welle, म्हणजे जर्मन भाषेत जर्मन वेव्ह – ही संस्था जर्मनीतील फेडरल टॅक्स बजेटद्वारे अनुदानित शासकीय जर्मन आंतरराष्ट्रीय प्रसारण संस्था आहे जी १९५३ पासून सर्वात यशस्वी माहिती मीडिया आउटलेट (प्रसारण संस्था) आहे आणि सध्या ३२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. DW Eco India हे पर्यावरणविषयक व्हिज्युअल (दृकश्राव्य) मॅगझीन आहे. जे भारतीय उपखंडाला समर्पित असून भारत आणि युरोपमधील जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक प्रकल्पांना प्रदर्शित करते. त्यांच्या शोमध्ये आशिया आणि युरोपमधील पर्यावरण, शाश्वतता, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषय यासारख्या आकर्षक थीम आहेत.हे मॅगझीन भविष्यातील उर्जा, पर्यायी संसाधन व्यवस्थापन, दळणवळणाचे भविष्य, शहरीकरण, जैवविविधता, संवर्धन, शाश्वत उपभोग, हवामान बदलाचा परिणाम, विषमता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यासह इतर महत्त्वाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक आव्हानांकडे दर्शकांचे लक्ष आकर्षित करते. दर्शक जेथे त्यांच्या स्वतःच्या कथा फोटो आणि व्हिडिओंसह सांगू शकतील, त्यांच्या कल्पना आणि उपक्रमांबद्दल व्यक्त होतील, इतरांना प्रेरित करून आजच्या आव्हानांसाठी रचनात्मक उपाय शोधण्यात मदत करतील असा एक परस्परसंवादी प्लॅटफॉर्म या मॅगझीनने उपलब्ध करून दिला आहे.इको इंडिया हे मॅगझीन वैयक्तिक आणि स्थानिक प्रकल्प – एका वेळी एक व्यक्ती, शहर आणि प्रदेश यावर लक्ष केंद्रित करून पर्यावरणीय समस्यांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन बदलणाऱ्या घटना, व्यक्ती, आव्हाने आणि नवकल्पनांना प्रकाश झोतात आणते.त्यांच्या काही उल्लेखनीय एपिसोडमध्ये महानगरीय कचरा व्यवस्थापन, भारतातील सर्वात दूषित नद्या स्वच्छ करण्याचे काम आणि मुंबईतील ध्वनी प्रदूषणाशी लढा देण्यासाठी उद्योजक उपायांचा समावेश आहे, तसेच पर्यावरण संरक्षण ही खरोखरच जागतिक समस्या कशी आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता आहे हे दाखवून देणाऱ्या युरोपीय शहरांचा समावेश देखील आहे. त्यांच्या मॅगझिन शोला हॅम्बर्ग येथील वर्ल्ड मीडिया फेस्टिव्हलमध्ये डॉक्युमेंटरीज : सस्टेनेबिलिटी श्रेणीमध्ये इंटरमीडिया ग्लोब सिल्व्हर प्राईझ देण्यात आले.