Mumbai Congress | राज्यात कॉंग्रेसला गळती झाली सुरु; पहिला आमदार फुटला,अजितदादा गटाच्या गळाला लागला

Mumbai Congress : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना आता कॉंग्रेसला राज्यात गळती सुरु झाली आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique) आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai Congress) फूट पडणार असल्याची चर्चा होती.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे