‘संविधानाचा खेळखंडोबा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

अमरावती – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे.((NCP split)) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..(Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला असताना माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. काल समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर त्या अपघातामध्ये बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या चितेची आग सुद्धा पूर्णपणे थंड झाली नसेल त्या वेळेत राज्यात हा सत्तेचा घोळ घातला गेला हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. सत्तेसाठी हपापलेले हे लोक इतके असंवेदनशील असू शकतात याची कल्पना देखील करू शकत नाही अशी टिका आमदार यशोमती ठाकूर यांनी आज घडलेल्या राजकीय घडामोडीवर केलेली आहे.

आम्ही कॉंग्रेस पक्षाचे पाईक आहोत. आणि आम्ही आमच्या शब्दांवर कायम पक्के आहोत. आम्ही जनमताचा असा अपमान कदापी करु शकत नाही आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन देतो की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणुन जनहिताचे काम आम्ही सातत्याने करीत राहु. हे जे खिचडी सरकार स्थापण झालेले आहे त्याला काहीही तथ्य नसुन हे खिचडी सरकार फार काळ चालुच शकणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाची तोडफोड सातत्याने होत आहे हे सहन करण्यासारखे नाही आम्ही संविधानाचा मान राखल्या जावा याकरीता सक्षम विरोधी पक्ष म्हणुनच कार्य करु. असेही त्या यावेळी म्हणाल्या.