कुराण वाचणारे आणि त्याचे पालन करणारे दहशतवादी आहेत असा दावा करणाऱ्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

बेंगळुरू : कुराण (Quran) आणि मुस्लिमांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कर्नाटकातील कोलार पोलिसांनी हिंदू जागरण वेदिकेचे राज्य निमंत्रक केशव मूर्ती (Keshav Murthy, State Convener of Hindu Jagran Vedika) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंजुमन-ए-इस्लामिया संघटनेचे अध्यक्ष जमीर अहमद (Jamir Ahmed, president of the Anjuman-e-Islamia organization) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

1 जुलै रोजी राजस्थानमधील उदयपूरमध्ये शिंपी कन्हैया लालच्या (Shimpi Kanhaiya Lal) हत्येप्रकरणी काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. तक्रारीनुसार, त्यावेळी केशव मूर्ती यांनी आपल्या भाषणात ‘कुराण वाचणारे आणि त्याचे पालन करणारे दहशतवादी आहेत’ असे म्हटले होते.एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 153B आणि 295A (धार्मिक भावना भडकावणे) अंतर्गत केशव मूर्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या शिंपीची दोघांनी हत्या केली होती. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ कन्हैयालालने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, त्यानंतर दोघांनी त्यांची हत्या केली होती आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैदही झाली होती. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद आणि इस्लामविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.