खेल अभी बाकी है…! लवकरच अजित पवार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? एकनाथ शिंदेंचा होणार गेम

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. (NCP split) राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली..(Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister.)

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खुलास्यावर  लोकांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द भाजपाने दिला असल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. “भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द आहे. विधानसभा अध्यक्षांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल आणि ते बाजूला झाले की, अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे,” असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.