यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

दौंड: दौंड (Daund)तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी  यवत पोलीस (Yavat Police Sation) स्टेशन च्या गुन्हे शोध शाखेने जेरबंद केली आहे .  या टोळीच्या चार आरोपींना अटक करण्यात आले आहे  .सदर आरोपींना मा अप्पर व सत्र न्यायालय बारामती यांनी ३ दिवस  पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे . अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली .

यवत पोलीस स्टेशन हद्दीत चोरी 

दिनांक ०२/०७/२०२२ रोजी मौजे बोरीभडक, ता.दौंड जि. पुणे येथील  शेत जमीन गट नं.१४/१ मधील शिवाजी धर्मा गायकवाड यांचे शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्यााने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरट्यााने चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होता.

गुन्हे शोध पथकाने सापळा रचला 

दिनांक ०८/०७/३०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी चोरणारे संशयित राहू शिवाजी चौक येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती . सदर पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ सह राहू गावातील छत्रपती शिवाजी महाराज चैक येथे सापळा लावून थांबले होते . यावेळी एक संशयित कार मधील चार जण राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले असता यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मारुती ८०० कारसह ताब्यात घेऊन विचारपूस केली  .  सदर संशयित व्यक्तींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २८ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले  .

चार आरोपींना अटक :

१) दत्ता अशोक शिंदे वय २८ वर्षे, रा.राहु, थोरले विहीर, ता.दौंड जि.पुणे २) राज मच्छिंद्र वानखडे वय १९ वर्षे, रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव, ता.मुर्तुजापुर, जि.अकोला ३) विशाल मनोहर सोनवणे वय ३० वर्षे रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (वय २९ वर्षे,) रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हयातील चोरीचा माल इसम नामे आमजद पाशामियाॅ खान( वय ४० वर्षे,) ( रा. साईनगर, कोंढवा, ता.हवेली, जि.पुणे ) यास विकल्याने त्यास सदर गुन्ह्याचेकामी ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडुन कि.रू १७६७५०/- रू च्या ३५०किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मारूती ८०० कार, एक पॅशन प्लस मोटार सायकल व चार मोबाईल असा १लाख ६० हजार रूपये किमतीसह एकुण ३ लाख ३६ हजार ७५० रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला  आहे.

सदर आरोपींना मा.अपर व सत्र न्यायालय बारामती यांनी ३ दिवस  पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून वरील आरोपींकडून यवत पोलीस स्टेशन कडील रोहित्र चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५३९/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७

२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५१५/२०२२, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७

३) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४८४/2022, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७

४) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५०६/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७ असे एकूण ४ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून ३,३६,७५०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी नामे दत्ता अशोक शिंदे रा.राहु थोरली विहीर, ता.दौंड, जि.पुणे हा रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असुन तो २६ गुन्हयांमध्ये निष्पन्न झालेला फरार होता. तसेच आरोपी नामे महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (रा.धुमळीचा मळा, केडगाव, ता.दौंड, जि.पुणे )व राज मच्छिंद्र वानखेडे (रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे ) हे  ११गुन्हयांमध्ये फरार होते.

कामगिरी करणारे पोलीस पथक :

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. गुरू गायकवाड, पो.हवा. गणेश कर्चे, पो.ना. अक्षय यादव, पो.ना. रामदास जगताप, पो.काॅ.प्रविण चैधर, पो.काॅ.मारूती बाराते, पो.हवा. सचिन गायकवाड,पो.ना. सुनिल कोळी, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केलेली आहे.