बनावट दारूच्या सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू, वीसहून अधिक रुग्णालयात दाखल

Punjab News : पंजाबमध्ये, संगरूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कथित बनावट दारूच्या सेवनामुळे मृतांची संख्या 21 झाली आहे. तर वीसहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या घटनेबाबत पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी, राज्य पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक गुरिंदरसिंग ढिल्लन यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय एस आय टी अर्थात विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. हे पथक व्यावसायिक आणि वैज्ञानिक पद्धतीने सर्व बाजूंनी तपास करणार आहे.

याप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मात्र राज्य सरकारने पीडित कुटुंबांना कोणतीही आर्थिक किंवा अन्य कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार