Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोळांच्या प्रचारासाठी पुण्यातील भाजपा आणि महायुतीतील मित्रपक्ष मैदानावर उतरले आहेत. जगदीश मुळीक, सुनील देवधर आणि मेधा कुलकर्णी हेदेखील मोहोळांच्या (Muralidhar Mohol) प्रचाराला लागले आहेत. अशातच आता मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी पुणेकरांना भाजपाला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कोथरूडमधील सर्व सक्षम पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांना मेधा कुलकर्णी यांनी आवाहन केले की त्यांनी कोथरूड मतदार संघातून 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचे लक्ष्य ठेवावे. 2014 साली युती नसताना या विधानसभेत नागरिकांनी मला सुमारे 65 हजार मताधिक्य देऊन आशीर्वाद दिले होते. सरळ सरळ झालेल्या मतदानाच्या 51% मतदान भाजपाला मिळाले होते. स्व. गिरीश बापट यांच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 1लाख 6 हजार मताधिक्य मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.

आत्ताच्या नवीन परिस्थितीत महायुतीमधील पक्ष समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे आता 2 लाखाचे लक्ष्य सक्षम पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमातून नक्की गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज