Ramdas Athawale | मोदींच्या नेतृत्वात संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने महिलांना न्याय मिळाला

Ramdas Athawale | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना न्याय दिला. महिलांना संसदेत आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा कायदा अनेक वर्षे प्रलंबित होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने महिलांना न्याय मिळाला आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात मोदींचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. नांदेड शहरातील बेला नगर येथे भाजप महायुतीचे नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जाहीर प्रचार सभेतरामदास आठवले (Ramdas Athawale) बोलत होते.

अनेक वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक प्रलंबित होते ते संसदेत मंजूर करण्याचे धाडस मोदींनी दाखवले आहे. मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार ने महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. चूल फुंकणाऱ्या गरीब ग्रामीण महिलांना गॅस सिलेंडर देणारी केंद्र सरकारची उज्ज्वला योजना देशभर यशस्वी झाली. बेटी पढ़ाओ बेटी बचाओ चा नारा देऊन महिला सक्षमीकरणाची कास मोदी सरकार ने धरली. आज महिला अनेक क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध करीत आहेत. महिला आयपीएस आय एस एस अधिकारी होऊन कर्तुत्व गाजवत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आपले नेतृत्व सिद्ध करीत आहेत.पुढील 2029 च्या निवडणुकीत महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

यावेळी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे , आयोजक शिवाजीराव भालेराव, धम्मपाल धुताडे आनंद कीर्तने; भाजप चे दिनेश मोरदाले आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन