Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा झाल्याचे पुरावासह पुण्यातील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, राज्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये दूध पुरवठा करण्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे यासंदर्भात मला एका निनावी व्यक्तीने आपल्याला या घोटाळ्याच्या ११ फाईल्स दिल्या असून मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे असे रोहित पवार म्हणाले.

पुढे रोहित पवार म्हणाले की, राज्यात एकूण ५५२ शासकीय आश्रम शाळा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील लहान मुले शिकतात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सरकारकडून पौष्टिक आहार दिला जातो. ज्यामध्ये २०० एमएल दूध दररोज या विद्यार्थ्यांना दिले जाईल असा जीआर काढण्यात आला आहे. त्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे.असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, जे एक २०१८-१९ मध्ये आणि २०२३-२४ मध्ये या वर्षांमध्ये करण्यात आलं आहे. हे दूध अमूल, चितळे, महानंदा यासारख्या कंपन्यांकडून घेऊन टेट्रा पॅकच्या माध्यमातून लहान मुलांना दिलं जातं. या दुधाची एका लिटरची किंमत ही ७०-७५ रुपये लिटर आहे. यामध्ये २०१८-१९ मध्ये हा करार झाला होता त्यावेळी ४६.४९ पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे त्यांच्याकडून दूध घेण्यात आलं होतं. तर त्यानंतर दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये अमूल सोबत ५०.५ रुपये एका टेट्रा पॅक मागे देण्यात आले.असेही रोहित पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की, तर २०२३-२४ मध्ये १६४ कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं. त्यामध्ये राज्यभरातील शासकीय आश्रम शाळांमध्ये कोट्यावधी दुधाचे टेट्रा देण्यात आली. मात्र एकीकडे शेतकऱ्यांकडून सरासरी ३० रुपये लिटरने दूध घेतलं जातं. मात्र या कंपन्यांनी या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेले दूध हे तब्बल १६४ रुपये प्रति लिटर या भावात दिलं आहे. त्यामुळे या गरीब मुलांना दूध देताना सरकारकडून या करारामध्ये ८५ कोटी पर्यंत खर्च येणे अपेक्षित होतो. जो १६५ कोटींवर गेला आहे. त्यामुळे यामध्ये सरकारने तब्बल ८० कोटींची दलाली दिली असल्याचा गंभीर आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, सरकारने महानंद या कंपनीला फायद्यामध्ये आणण्यासाठी गुजरातला दिल्याचे सांगितलं. मात्र या सर्व दुधाचं कंत्राट महानंदला देण्यात आलं असत तर ८४ कोटींचं प्रॉफिट केवळ महानंदला झाला असता. मात्र यामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला तसेच सत्तेत असणाऱ्या एका कोल्हापूरच्या नेत्याच्या सहकारी संस्थेला देण्यात आलं. जे दूध शेतकऱ्यांकडून ३० रुपये लिटरने घेण्यात आलं. तेच दूध या गरीब विद्यार्थ्यांना तब्बल १८३ रुपये लिटर याप्रमाणे दिले गेले. हा करार जर मार्चमध्ये झाला. तर काही लोक विकासासाठी भाजपसोबत जाण्याचं तीन महिने आधीच ठरलं होतं का? असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज