Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार

Sharad Pawar – दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दोन तासाच्या चौकशीनंतर अटक केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) साहेब म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असल्याचं यातून स्पष्ट दिसून येत आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू. याची किंमत भाजपला आणि केंद्र सरकारला मोजावी लागेल, असेही शरद पवार म्हटले.

पवार साहेब म्हणाले की, निवडणुकीच्या काळामध्ये भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही असे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरूगांत टाकण्याचं काम केलं जात आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, ही चितेंची बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज