प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – विद्यमान आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन (Tax collection) आठ लाख 98 हजार कोटी रुपये झालं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 23 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल जाहीर केलं. कर परताव्याचं प्रमाणही वाढलं असून सात लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचे कर परतावे देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 16 पूर्णांक 3 टक्के जास्त आहे.

अंदाजपत्रकातील अपेक्षित कर संकलनाच्या तुलनेत 52 टक्क्यांहून अधिक कर गोळा झाला आहे. या वर्षी एक एप्रिल ते आठ ऑक्टोबर या कालावधीत एक लाख 53 हजार कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला असून गेल्या वर्षातील याच कालावधीतील परताव्यापेक्षा त्यात 81 टक्के वाढ झाली आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.