नाशिकच्या 34 नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Mumbai – मागील काही दिवसांपासून काही शिवसैनिक (Shivsainik) संभ्रमावस्थेत आहेत. अशा राजकीय वातावरणात अनेक शिवसैनिकांना शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. मात्र कडवट शिवसैनिक आता आक्रमक झाले असून शिवसेनेच्याच (Shivsena) सोबत राहण्याचा निर्धार करण्यात येत आहे.

आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आणि मालेगावमधील नगसेवक उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या भेटीला आले आहेत. ते मातोश्रीत (Matoshree) दाखल झाले असून ते आम्ही तुमच्यासोबत असल्याचे समर्थन दाखवण्यास आले आहेत. 34 नगरसेवक मातोश्रीत दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मातोश्रीच्या बाहेर दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळे अस्तित्व निर्माण केल्यानंतर जिल्ह्यातून माजी कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) आणि आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर या दोघांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनीही शिंदे यांना समर्थन दिले. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारीही शिंदे यांना साथ देतील, असे मानले जात होते. परंतु, तसे झाले नाही असंच सध्या चित्र आहे.