कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय? जयंत पाटील यांचा केंद्र सरकारला सवाल

Jayant Patil: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची ‘गॅरंटी’ काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे ते म्हणालेत की, निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे. हे आता नित्याचेच झाले आहे. वाढलेले ४० रुपये व कमी केलेले २ रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची ‘गॅरंटी’ काय?

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?