कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : मतमोजणीच्या पाचव्या फेरीत जाणून घ्या कोण आहे आघाडीवर ? 

 कोल्हापूर –  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला( Kolhapur North by-election polls) सुरुवात झाली आहे.  मुख्य लढत ही भाजप आंनी कॉंग्रेस मध्येच होत असून भाजपकडून सत्यजित कदम(Satyajit kadam)  तर कॉंग्रेसकडून जयश्री जाधव(Jayashree jadhav)  मैदानात आहेत.

दरम्यान, पाचव्या फेरीत कदमवाडी, जाधववाडीमधील मजमोजणी पूर्ण झाली आहे. यात जयश्री जाधव यांना 3673 मतेतर सत्यजीत कदम यांना 4198 मते मिळाली. पाचव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना एकूण 6758 मतांची आघाडी आहे.

दरम्यान,  कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. विजयाचं चिन्ह दिसत आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर दिली.