बिहारच्या NDA सरकारच्या मंत्रिमंडळात नितीश कुमारसह 9 नावांचा समावेश, पाहा कोणत्या पक्षाचा नेता होणार मंत्री?

Nitish Kumar Cabinet: बिहारच्या राजकारणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचीही घोषणा करण्यात आली असून, ते आज संध्याकाळी शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळाच्या नव्या समीकरणात नितीश वगळता जेडीयूला तीन आणि भाजपला तीन मंत्री मिळाले आहेत. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या ‘हम’लाही स्थान मिळाले असून एकमेव अपक्ष सुमित कुमार सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

एनडीए सरकारमधील हे नवे समीकरण आहे

दरम्यान आता बिहारच्या नव्या एनडीए सरकारमधील मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. एकूण नऊ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. या आघाडीत नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, जेडीयूकडून विजेंद्र यादव, अपक्ष सुमित कुमार सिंह आणि ‘हम’मधून संतोष कुमार सुमन यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर: रमेश चेन्नीथला

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी