गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

Nawajuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचे सर्वांनाच वेड लागले आहे. प्रत्येक वेळी तो आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो. नवाजुद्दीन जेव्हाही कोणत्याही पात्राची भूमिका साकारतो तेव्हा तो त्यात तल्लीन होऊन जातो. खऱ्या आयुष्यात शांत असलेला नवाजुद्दीन पडद्यावर पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिरेखेत रुपांतर करतो. नवाजुद्दीन दारूचे सेवन करतो असे अनेकांचे मत आहे. नुकतेच या अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दारूचे सेवन कमी करतो. अभिनेत्याने सांगितले की तो गांजा ओढतो.

‘होळीला प्यायला छान वाटतं’
अनफिल्टर्ड विथ समदीशला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा होस्टने नवाजुद्दीनला त्याच्या आवडत्या ड्रिंकबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “मी एक कभी कभी वाला और थोडा बूह वाला हूं. मला माझे स्टेटस आठवते.” जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने पहिल्यांदा दारू कधी प्यायली. नवाजुद्दीन म्हणाला की तो सहसा दारू पीत नाही, त्याला होळीच्या दिवशी दारू प्यायला आवडते. “माझा आवडता सण होळी आहे, कारण त्या सणात तुम्हाला दारू प्यायला मिळते.” त्याने सांगितले की, अभिनेता स्वानंद किरकिरेने त्याला होळीच्या दिवशी थंडाई दिली होती, त्यानंतर त्याला सामान्य व्हायला दोन दिवस लागले.

नवाजुद्दीनला गांजा आवडतो
जेव्हा अभिनेत्याला गांजाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले की त्याला गांजा आवडतो. “बरं वाटतं, खूप छान वाटतं. मला मजा येते, जेव्हा मी संगीत सुरू करतो तेव्हा मी काहीतरी वेगळं होऊन जातो.” नवाजुद्दीन त्याच्या आगामी चित्रपट सेक्शन 108 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अरबाज खान आणि रेजिना कॅसांड्रा देखील दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले