उर्फी जावेदचं सामान गेलं चोरीला, दारुड्या कॅब ड्रायव्हरविरोधात अभिनेत्रीने केली तक्रार

नवी दिल्ली- आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिने कॅब ड्रायव्हरविरोधात तक्रार केली आहे. ती दिल्लीत आल्याचे तिने सांगितले. यादरम्यान तिने उबर अॅपवरून कॅब बुक केली. पण तिचा अनुभव अजिबात चांगला नव्हता. कारण कॅबचा चालक तिच्या सामानासह बेपत्ता झाला. मोठ्या प्रयत्नांनंतर तो परत आला, पण तो नशेत होता. कॅबचा अनुभव शेअर करत उर्फी जावेदने ट्विटरवर तक्रार केली आहे.

उर्फी जावेदने कॅबचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला आहे. तिने लिहिले की, मला उबर कॅब सेवेचा खूप वाईट अनुभव आला आहे. मी दिल्लीत होते. मी सहा तासांसाठी कॅब बुक केली होती. विमानतळावर परतताना मी जेवणासाठी थांबले. यादरम्यान कॅबचा ड्रायव्हर माझे सामान घेऊन फरार झाला. इतक्यात माझ्या एका मित्राने मला मदत केली आणि मग ड्रायव्हर कसा तरी परतला. सुमारे तासाभरानंतर ड्रायव्हर पूर्णपणे नशेत परतला.

उर्फी जावेदने पुढच्या ट्विटमध्ये सांगितले की, त्या व्यक्तीला नीट चालताही येत नव्हते. प्रथम तो पार्किंगच्या जागेबद्दल खोटे बोलला. यानंतर माझ्या मित्राने सतत फोन केला. तो त्याच्या जागेवरून हलतही नव्हता.

याशिवाय उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी देखील पोस्ट केली आहे. जिथे ती म्हणाली की, उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षिततेच्या विरोधात आहे. मला खूप वाईट अनुभव आला आहे. आधी ड्रायव्हरने माझे सामान घेतले आणि नंतर दोन तासांनी मद्यधुंद अवस्थेत परतला. उर्फीच्या ट्विटनंतर कंपनीचे उत्तरही आले आणि त्यांनी उर्फीची माफी मागितली.