वारं फिरलं : संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई – ED ने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल रात्री मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यांना आज  न्यायालयात हजर केले जाईल, जिथे एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे. त्याच्या अटकेपूर्वी, ईडीने (ED) राऊतच्या भांडुप निवासस्थानाची नऊ तासांहून अधिक काळ झडती घेतली आणि नंतर मग मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना आता स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकावल्याप्रकरणी देखील संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याच (Vakola Police Station) राऊतांवर गुन्हा दाखल झाला. स्वप्ना पाटकर यांनी धमकावल्याची तक्रार केली होती. त्यावर शनिवारी राऊतांवर एनसी (NC) दाखल करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर राऊतांवर 504 आणि 509 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली.