रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी, राजकीय चर्चांना आले उधाण

राजस्थान: काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहोचली आहे. आज राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील भदोती येथून या यात्रेची सुरुवात झाली. यादरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गर्वनर रघुराम राजन (Raghuram Rajan) हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा आनंद घेतला.

पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी राजन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. चहाच्या ब्रेकपर्यंत दोघेही सतत बोलत होते. रघुराम राजन हे सतत आर्थिक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडत असतात. तसेच मोदी सरकारच्या धोरणांवरही आवाज उठवत असतात. राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचे भारत जोडो यात्रेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काँग्रेसनेही ट्वीटर अकाउंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत.