Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई

Praniti Shinde | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट त्यांचे उमेदवार जाहीर करू शकतात.दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. मात्र मविआतल्या पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वंचितचा कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी वंचितवर अप्रत्यक्ष टीका केली असून यातून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना म्हटलं होतं की, मागील निवडणुकीत काही पक्षांमुळे काँग्रेसची मतं काही प्रमाणात कमी झाली होती. ज्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. जो पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची मतं कमी करतो किंवा मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो. काही पक्षांमुळे धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होतं. त्यामुळे तिथे काँग्रेस किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचा नेता निवडून येत नाही.या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका