Santosh Bangar | बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना देऊन महापाप केलं, संतोष बांगर यांचे वादग्रस्त वक्तव्य

Santosh Bangar | लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभांचा धडाका लावला आहे. सध्या ते हिंगोली दौऱ्यावर असून येथील कळमनुरी येथील सभेला संबोधित करताना त्यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर टीका केली आहे. मी संतोष बांगर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन महापाप केलं होतं. आता या निवडणुकीत तुम्ही त्यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा, असं आवाहन ठाकरेंनी कळमनुरी मतदारसंघातील लोकांना केलं.

आता संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना देऊन महापाप केले आहे. मी त्यांच्या पक्षात असताना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. त्याचबरोबर दंगल झाल्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची, अशी प्रतिक्रयाही संतोष बांगर यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका