जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

Terrorist attack on military vehicles in Jammu and Kashmir – जम्मू आणि काश्मिरमध्ये पुँछ जिल्ह्यात थानामंडी इथं लष्करी वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवानांना वीरमरण आलं आहे आणि 2 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला दिली. डेरा की गली इथं रात्री उशीरापर्यंत चकमक सुरु होती.

काही दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन वाहनांमधून लष्कराचे जवान कारवाईसाठी जात असताना हा हल्ला झाला. जवानांनी जोरदार प्रतिकार केला. सावनी भागातील थानामंडी सुरांकोट रस्त्यावर ही चकमक अद्याप सुरु असून पुढील वृत्ताची प्रतीक्षा आहे.

संरक्षण दलाच्या पीआरओने ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यांनी काल (२० डिसेंबर) रात्री एक संयुक्त ऑपरेशन सुरू केलं होतं. आज संध्याकाळी संपर्क प्रस्थापित झाला असून चकमक सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले