Solapur News | प्रणिती शिंदेंच्या विरोधात आता ‘या’ महिला नेत्याच्या नावाची होतेय चर्चा

Solapur News  | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट त्यांचे उमेदवार जाहीर करू शकतात. दरम्यान सोलापूर (Solapur News ) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

माढा लाेकसभा मतदार संघात माेहिते पाटील यांच्या माेठ्या विराेधानंतरही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर साेलापुरात भाजप आमदार राम सातपुते तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्याेती वाघमारे यांच्यात नावावर अजूनही संभ्रम आहे.

भाजपने माजी खासदार शरद बनसाेडेंच्या तसेच अमर साबळे यांच्या नावाची चाचपणी केली. दरम्यान सोलापूर मतदारसंघाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे देखील इच्छुक आहेत. दुसऱ्या बाजूला मविआच्या स्थानिक बैठकीत प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीत देखील सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका