Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

अजित पवार (Ajit Pawar) हे बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि महायुतीसोबत हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. या बंडखोरीवरुन अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यावर आता शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) म्हणाले की, श्रीनिवास पवार मनमिळावं स्वभावाचे आहेत. ते अतिशय सुज्ञ आहेत. घर फुटलं हे खूप वाईट वाटत आहे. त्यामुळेच श्रीनिवास पवार यांनी जे सांगितलं ते प्रामाणिकपणे सांगितले. आपण आपल्या आजोबांची उमेद वाढवतो आणि हे त्यांच्या मृत्यूची वाट बघतात. आता त्यांना घरातून प्रतिक्रिया मिळत आहे. ते पण सख्यांकडून मिळतेय. पवार कुटुंबात घरात एकी होती. दरवर्षी दिवाळीत ती दिसत होती. परंतु एकत्रित कुटुंब आज फुटलंय, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

श्रीनिवास पवार यांच्या बोलण्यातून कृतज्ञता दिसत आहे. घरातला सख्खा भाऊ बोलतोय, ज्या माणसाने 50 वर्ष बांधून ठेवलं, जे आज कसे वाईट झालं? असा प्रश्न अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. हे घर फोडल्यामुळे शरद पवार यांना किती यातना होत असतील. शरद पवार यांना मन, भावना, यातना नाही का? त्यांनी तुम्हाला चारवेळा उपमुख्यमंत्री बनवले, मंत्री बनवले हे श्रीनिवास हे देखील बोलले. आता श्रीनिवास पवार यांना उत्तर द्यायला कोण पुढे येईल? मला बोलणारे आता श्रीनीवास पवारांना बोलतील का?, असे आव्हाड यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी