Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Shrinivas Pawar | अजित पवार (Ajit Pawar) हे बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि महायुतीसोबत हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. या बंडखोरीनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात आमनेसामने असणार आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आता बारामती लोकसभेच्या लढतीसाठी रणांगणात उतरले आहे. दरम्यान अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दादांना फटकारले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवारांना सुनावले आहे.

काटेवाडीतून अजित पवारांसह भाजपावर हल्ला चढवताना श्रीनिवास पाटील म्हणाले, पवार नाव संपवायचे, ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाल आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला. आता त्यांनी घरच फोडले. साहेबांना एकुलती एक एक मुलगी आहे. या वयात त्यांना काय वाटत असणार? लक्षात ठेवा वय वाढले म्हणून वयस्कर माणसांना तुम्ही कमजोर समजू नको. त्यांनी तुमच्यावर राज्य सोपवले होते. ते दिल्ली पाहत होते. परंतु तुम्ही वेगळेच काही केले, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी