अभाविप गंगाखेडने रांगोळीतुन साकारली बिरसा मुंडा यांची प्रतिकृती

गंगाखेड/विनायक आंधळे :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गंगाखेड शहर शाखेकडून मंगळवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत जनाबाई महाविद्यालय येथे त्यांची रांगोळी द्वारे भव्य प्रतिकृती काढण्यात आली.

जल, जमीन आणि जंगलांच्या संवर्धनासाठी झटणारे, जननायक भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी आगळ्यावेगळ्या प्रकारे अभिवादन करण्यात आले. यावेळी, प्राचार्य बी.एम.धुत, शहर अध्यक्ष प्रा.डाॅ.अशोक केंद्र, शहर मंञी कु.वैष्णवी अनावडे, महाविद्यालय अध्यक्ष भरत गव्हाणे, आदी सह विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक उपस्थित होते.