‘काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!’

Mumbai – शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. दसरा मेळावा कुणाचा जोरदार होणार यावरून बरीच चर्चा सुरु असताना आता आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे.

“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचीसाथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे.” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.