अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान, टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही मंत्रिपदी वर्णी

मुंबई : आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होतोय. यात अब्दुल सत्तार शपथ घेणार आहेत. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही सत्तारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.  या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार  मात्र 39 दिवस रखडला होता. पण आता आज या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार  होत असून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सत्तारांना स्थान मिळालं आहे.

शिंदे गटातील मंत्री –

तानाजी सावंत

उदय सामंत

संदीपान भुमरे

दादा भुसे

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

शंभूराज देसाई

संजय राठोड

गुलाबराव पाटील

भाजपकडून मंत्री-

गिरीश महाजन

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

सुरेश खाडे

राधाकृष्ण विखे पाटील

अतुल सावे

रवींद्र चव्हाण

विजयकुमार गावित

मंगलप्रभात लोढा