पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर Zainab Abbasने वर्ल्ड कपच्या मध्यावर भारत सोडला, कारण धक्कादायक आहे

Zainab Abbas Leave India: पाकिस्तानची क्रीडा प्रस्तुतकर्ता आणि अँकर झैनाब अब्बास विश्वचषक 2023 (World Cup 2023) दरम्यान भारत सोडून गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला भारत सोडण्यास सांगण्यात आले कारण यापूर्वी ती सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे वादात सापडली होती. तिचे अनेक जुने ट्विट व्हायरल झाले होते, ज्यात ती भारत आणि हिंदू धर्माबद्दल वाईट बोलतांना दिसत होती.पाकिस्तानच्या ‘समा टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या एक्स अकाऊंटनुसार (पूर्वीचे ट्विटर) झैनब अब्बासने भारत सोडला आहे. जैनबने सुरक्षेच्या कारणास्तव भारत सोडला. ती सध्या दुबईत आहे. तिच्यावर सायबर गुन्हे आणि जुने भारतविरोधी ट्विटचा आरोप आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, विनीत जिंदाल नावाच्या एका भारतीय वकिलाने बीसीसीआयसह जैनबविरोधात तक्रार दाखल केली होती. विनीत जिंदाल यांनी त्यावर लिहिले. ‘अतिति देवो भव’ फक्त त्यांच्यासाठी आहे जे आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करतात पण भारतविरोधी लोकांचे आपल्या मातीत स्वागत नाही.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार