‘इतकी भिकार XX’ झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही….’  अब्दुल सत्तारांचं वक्तव्य 

जालना – कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबादेत सभा आयोजित करण्यात आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ सिल्लोडमध्ये ही सभा होत आहे. यासाठीच्या तयारीबद्दल आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांची मुलाखत सुरु होती. यावेळी सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर देण्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीदेखील घातली. इतकी भिकार**  झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ… असं उत्तर त्यांनी दिलं.