Virat Kohli : पंचांनी विराटच्या शतकासाठी दिला नाही वाइड बॉल? वाचा ICCचा नियम काय सांगतो

Virat Kohli Century: 2023च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या वनडे कारकिर्दीतील 48 वे शतक झळकावले. मात्र, त्याच्या शतकादरम्यान या सामन्याचे मैदानावरील पंच रिचर्ड कॅटलबरो (Umpire Richard Kettleborough) चर्चेत आहेत.

बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू नसुम अहमदची चाल पंच रिचर्ड यांनी हाणून पाडली. त्या डावपेचाखाली नसूमला विराटला शतक करण्यापासून रोखायचे होते. मात्र, कॅटलबरोने त्याची चाल फसवली आणि विराटने आपले शतक पूर्ण केले. मात्र, पंच कॅटलबरोच्या त्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे.

त्याचे झाले असे की, 42व्या षटकात विराटने षटकार मारण्याआधी जे घडलं त्यामुळे पंच रिचर्ड कॅटलबोरो यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नसुम अहमदने टाकलेल्या षटकात पहिला चेंडू लेग साइडला पडला. तरीही पंचांनी वाइड बॉल दिला नाही. त्यावेळी कॅटलबरो यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्यही होतं. यामुळे त्यांच्यावर काही चाहत्यांनी टीकाही केली. क्रीडा समीक्षकांनी कॅटलबरो यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोपही केला. मात्र पंचांनी आयसीसीच्या नियमानुसारच हा निर्णय दिलाय.

चेंडू फलंदाज उभा असलेल्या जागेपासून दूरवरून गेल्यास आणि खेळण्याआधी उभा असताना जिथे होता तिथूनही गेला तरी चेंडू वाइड देण्याचा नियम याआधी होता. मात्र मार्च 2022 मध्ये नियमात बदल केला. त्यानुसार गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी फलंदाज क्रीजवर आधीच्या तुलनेत बऱ्याचदा त्यांची जागा बदलतात. त्यामुळे आता गोलंदाजाने चेंडू टाकताना फलंदाज जिथे उभा होता तिथे चेंडू पडल्यास तो वाइड दिला जात नाही. विराट जिथे उभा होता तिथेच नसुमचा चेंडू पडला. पण विराट पुढे सरकल्याने चेंडू बाजूने गेला. जर विराटने पाय हलवला नसता तर चेंडू पॅडवर आदळला असता.

https://youtu.be/GMBHhZWD_eQ?si=UsTpgBho4OzlvVgE