घराची काच काय, अब्दुल सत्तार सापडला असता तर त्याचं डोकं फोडलं असतं – चव्हाण 

मुंबई – – कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबादेत सभा आयोजित करण्यात आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ सिल्लोडमध्ये ही सभा होत आहे. यासाठीच्या तयारीबद्दल आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांची मुलाखत सुरु होती. यावेळी सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर देण्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीदेखील घातली. इतकी भिकार**  झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ… असं उत्तर त्यांनी दिलं.

 राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची टीका 
महाराष्ट्रातील मंत्र्याला, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीला अशोभनीय असं वर्तन आहे. सावित्रीबाईंच्या आम्ही लेकी आहोत, आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, सुसंस्कृत महाराष्ट्र आम्ही पाहिला आहे, अब्दुल सत्तार सारखे मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. घराची काच काय, अब्दुल सत्तार सापडला असता तर त्याचं डोकं फोडलं असतं, एवढा संताप आहे कार्यकर्त्यांमध्ये, त्यांना बोलताना शरम नाही वाटली का? या माणसाला शरम नाही. या बंगल्यात घुसून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.