वाहन परवान्याच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर केल्यास होणार कारवाई

वर्धा : शिकाऊ अनुज्ञप्ती (learning license) काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये (RTO Office) जाण्याची व चाचणी देण्याची गरज नसुन फक्त फोटो (Photo) व आधारकार्ड (Adhar Card) दया आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवा, अशा अफवा (Rumors) पसरविल्या जात आहे. त्यामुळे शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्ती (Driver’s license) काढतांना महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे, मोटार ड्रायव्हिंग स्कुल ईत्यादी संस्थांनी जर ऑनलाईन सुविधांचा (online facilities) गैरवापर केल्यास मोटार वाहन अधिनियम (Motor Vehicle Act) 1988 च्या कलम 19(1)(इ) अन्वये कारवाई करण्यात येईल.

वाहन परवाना प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना वाहतुक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदा-यांचे महत्व याची माहिती व जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रिय मोटार वाहन नियम 11 अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. यासाठी नागरिकांनी अनुज्ञप्ती काढतांना ऑनलाईन अर्ज करुन वाहन चाचणी देऊनच वाहन परवाना प्राप्त करुन घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी(Deputy Regional Transport Officer) कळविले आहे.