अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर करतायत एकमेकांना डेट? ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली| बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे दिसत आहे. नुकतेच अनन्याने कबूल केले आहे की ती आदित्य रॉय कपूरला आकर्षक मानते. अलीकडेच करण जोहरने या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून बॉलीवूड क्षेत्रात त्यांच्या नात्याबद्दल अफवा पसरल्या आहेत.

‘कॉफी विथ करण 7’ मधील अनन्या पांडेची कबुली सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती. परंतु, करण जोहरला याचे जास्त आश्चर्य वाटले नाही, कारण त्याने त्याच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांचे बाँडिंग पाहिले होते. आता हे दोघे क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले असून कॅमेरासाठी एकत्र पोजही देताना दिसले आहेत.

क्रिती सेनॉनने 19 ऑक्टोबर रोजी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरला एकत्र पाहिले गेले होते. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनन्या, नेहा, अंगद आणि आदित्य व्यतिरिक्त अनेक सेलेब्स क्रितीच्या पार्टीत सहभागी झाले होते. वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत पोहोचला होता, तर वाणी कपूर एकटीच आली. या पार्टीत अभिषेक बॅनर्जी, सनी सिंग, कनिका ढिल्लन आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते.