“दिशा पाटनी माझी…”, आदित्य ठाकरेंनी बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडले मौन

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackera) आणि बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हे बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये अफेयर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या केवळ अफवा होत्या की सत्य?, यावर आता खुद्द माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. कर्ली टेल्सशी बोलताना आदित्य ठाकरेंनी दिशा पाटनीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल (Aditya Thackeray Disha Patani Affair) भाष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी ‘कर्ली टेल्स’च्या संडे ब्रंचला भेट देत मुलाखत दिली. त्यात त्यांनी दिशा पाटनीशी असलेल्या संबंधांवर जाहीरपणे भाष्य केलं आहे. ‘कर्ली टेल्स’च्या कामिया जानी यांनी आदित्य यांना मुलाखतीत ‘बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर तुमचं नाव जोडलं गेलं त्या अफवा होत्या, त्या खऱ्या असत्या तर?’, असा सवाल केला.

त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नाही, असं काहीही नाहीये. त्या सगळ्या अफवाच आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्री माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळं आता आदित्य ठाकरे यांनी दिशा पाटनीसोबत कोणतंही अफेयर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

https://youtu.be/MGtb68M60oY