AFG vs PNG | पापुआ न्यू गिनीला पराभवाचा धक्का देत अफगाणिस्तान संघाने गाठली सुपर-8 फेरी

टी20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा (AFG vs PNG) पराभव केला. या विजयानंतर अफगाणिस्तानचे 3 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. तसेच राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने सुपर-8 फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनीचा संघ 19.5 षटकांत 95 धावांत गुंडाळला गेला. अशाप्रकारे अफगाणिस्तानसमोर 96 धावांचे लक्ष्य होते. अफगाणिस्तानने अवघ्या 15.1 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानकडून गुबाल्डिन नायब 36 चेंडूत 49 धावा करून नाबाद परतला. याशिवाय, मोहम्मद नबीने 23 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला.

रशीद खानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक (AFG vs PNG) जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यू गिनीची सुरुवात चांगली झाली नाही, ठराविक अंतराने फलंदाज पॅव्हेलियनकडे वळत राहिले. पापुआ न्यू गिनीसाठी किपलिन डोरिगाने सर्वाधिक धावा केल्या. किपलिन डोरिगाने 32 चेंडूत 27 धावा केल्या. याशिवाय अले नाऊने 19 चेंडूत 13 धावा केल्या. तर सलामीवीर टोनी उराने 18 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. याशिवाय पापुआ न्यू गिनीच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे पापुआ न्यू गिनी संघ अवघ्या 95 धावांत गारद झाला.

अफगाणिस्तानकडून फझलुल्ला फारुकीने सर्वाधिक 3 बळी घेतले. नवीन उल हकने 2 बळी घेतले. याशिवाय नूर अहमदला 1 यश मिळाले.

अफगाणिस्तानसाठी गुबाल्डिन नायब चमकला
पापुआ न्यू गिनीच्या 95 धावांना प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान 7 चेंडूत एकही धाव न काढता बाद झाला. रहमानउल्ला गुरबाजने 7 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. मात्र, यानंतर गुलबदिन नायब आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण अजमतुल्ला उमरझाई 18 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्यानंतर गुबाल्डिन नायब आणि मोहम्मद नबी यांनी विरोधी गोलंदाजांना संधी दिली नाही.

पापुआ न्यू गिनीतर्फे अले नाओशिवाय सिमो कामिया आणि नॉर्मन नानुआ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप