अहमदनगर : नुपूर शर्माचा डीपी ठेवल्यानं तरुणावर प्राणघातक हल्ला? तरुणाची मृत्यूशी झुंज

अहमदनगर : कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

उदयपूर आणि अमरावतीतल हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हत्येचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून सकाळीच फिर्याद नोंदवून घेत तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोर आणि ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यात जुनी भांडणे आहेत. दोघांची जुनी पार्श्वभूमीही तपासून पाहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.