उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; मातब्बर नेता करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. चिंचवडचे राहुल कलाटे (Rahul Kalate )शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे, निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी कलाटे यांनी निवडणूक लढवली होती मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. आता शिंदे यांच्या नेतृत्वात ते काम करणार असल्याने त्यांच्यावर शिंदे आता काय जबाबदारी देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.