मित्राच्या बहिणीवर झाले प्रेम, धर्माची भिंत ओलांडून मुस्लिम मुलीशी लग्न; आगरकरांची फिल्मी प्रेमकथा वाचा

Ajit Agarkar Love Story: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज 4 डिसेंबर 2023 रोजी 46 वर्षांचे झाले. आगरकर यांचा जन्म 1977 मध्ये मुंबई येथे झाला. माजी उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या धारदार गोलंदाजीने टीम इंडियाला अनेकदा विजय मिळवण्यात मदत केली. आगरकरांची प्रेमकहाणी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. ते त्यांच्या मित्राच्या बहिणीला भेटले आणि पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले. आगरकर आणि फातिमा घडियाली यांचा विवाह 2002 साली झाला. दोघांचेही धर्म भिन्न होते, त्यामुळे त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली.

अजित आगरकर 1999 मध्ये फातिमा घडियाली यांना पहिल्यांदा भेटले. फातिमा अनेकदा तिच्या भावासोबत स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी जात असे. त्यादरम्यान आगरकर फातिमाला भेटले आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. आगरकरांचा जन्म एका मराठी पंडित कुटुंबात झाला. भारतीय क्रिकेटपटूसाठी फातिमाशी लग्न करणे सोपे नव्हते. दोघांचेही कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. अशा स्थितीत दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची शपथ घेतली. 9 फेब्रुवारी 2002 रोजी दोघांचे लग्न झाले.

आगरकर 2000 साली फातिमाला भेटले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित आगरकरने 2000 मध्ये फातिमाची भेट घेतली होती. त्यावेळी फातिमा एका खासगी कंपनीत व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करत होत्या. फातिमाच्या भावाचे नाव मजहर घडियाली असून तो आगरकरांचा मित्र होता. आगरकर आणि फातिमा यांना राज नावाचा मुलगा आहे.

अजित आगरकरच्या नावावर कसोटीत शतक आहे
221 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 349 बळी घेणारे अजित आगरकर 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. आगरकरांनी 1998 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2006 मध्ये खेळला होता. आगरकरने 26 कसोटी सामन्यात 58 बळी घेतले. या काळात त्याच्या बॅटमधून 571 धावा झाल्या. आगरकरच्या नावावर 191 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 288 बळी आहेत. तर 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 3 विकेट आहेत. आगरकरने कसोटीत एक शतक झळकावले आहे तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 3 अर्धशतके आहेत.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा