लाइव्ह मॅचमध्ये अर्शदीप सिंगमुळे अंपायरला ‘इजा’, मोठी दुर्घटना टळली; पाहा video

Umpire Injured During IND vs AUS 5th T20: बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सहा धावांनी पराभव केला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ विजयी होईल असे वाटत होते पण अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) शानदार गोलंदाजीने त्यांच्याकडून विजय हिसकावून घेतला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र, यादरम्यान अर्शदीपने पंचांना इजा केली. चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात त्याने अंपायरला दुखापत केली. यामुळे पंचांना वेदना तर झाल्याच पण ऑस्ट्रेलियाचेही नुकसान झाले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ गडी गमावून 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण षटके खेळून केवळ 154 धावा करू शकला आणि सामना सहा धावांनी गमावला. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने 54 धावांची खेळी खेळली.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. मॅथ्यू वेड समोर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित वाटत होता. तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने त्याला बाद केले. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असे काही घडले की अंपायर वेदनेने ओरडले. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिस समोर होता. अर्शदीपने राऊंड द विकेटवरून चेंडू टाकला, एलिसने समोरच्या दिशेने शॉट खेळला. शॉट खूप वेगवान होता. अर्शदीपने तो थांबवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या हाताला लागून अंपायरच्या मांडीला लागला. अंपायरला काही काळ वेदना सुरू झाल्या पण नंतर ते बरे झाले. पंचांना गंभीर दुखापत झाली नाही हे सुदैवी.

मात्र यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. हा चेंडू अर्शदीपच्या हाताला लागला नसता तर थेट चौकार लागला असता. मात्र, यावर एक धाव आली. शेवटच्या चेंडूवरही अर्शदीपने केवळ एक धाव देत भारताला विजयापर्यंत नेले. या सामन्यात अर्शदीपने चार षटकात 40 धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा