तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

Dheeraj Ghate On Election Results: भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला
यावेळी बोलताना घाटे म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे’

यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी घाटे यांच्यासह पुणे भाजपा प्रभारी माधवजी भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर,राहुल भंडारे उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे प्रिया शेंडगे, गायत्री खडके राजेंद्र काकडे गणेश बगाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”