Ajit Pawar | अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप, 137 जणांचा राजीनामा

लोणवळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गटात) (Ajit Pawar) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार ( Ajit Pawar) गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिलाय. दरम्यान, यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

“आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. २० ते २५ वर्ष झालं पक्षाच काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का?”, असा सवाल सर्वांनी केला आहे.लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आलीय. त्यांना काही अनुभव नाही असं असताना ही त्यांना संधी देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल