Ajit Pawar | ‘उतारवयात फार कंटाळा आला, तर….’ अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोमणा

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha 2024) मतदारसंघातील वातावरण तापले आहे. यातच आता काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल अख्खा दिवस बारामतीमध्ये घालवला. बारामतीमध्ये त्यांनी सभांचा धडाका लावला. मतदारांशी संपर्क साधला.

अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना आपले काका शरद पवार यांना पुन्हा लक्ष्य केले. उतारवयातील लोकांनी आशीर्वाद देण्याच काम करायच असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं. असे म्हणत शरद पवारांना टोमणा मारला.

सध्या खूप जणांना फोन येत आहेत. खूप जणांना बोलावल जातय. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हाय़च की विकास कामांच्या मागे उभं रहायच हे तुम्ही ठरवायचय असं अजित पवार मतदारांना म्हणाले. आपलं भलं करुन घायचं, तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा की, तालुक्यातील विकासकामांना खीळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे असे देखील पवार यांनी म्हटले आहे.   दरम्यान, अजित पवार यांच्या या टीकेला आता शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?