Rajesh Kshirsagar | ‘कोरोना काळात जनतेला घराची प्रवेश बंदी करणाऱ्यांनी राजेश क्षीरसागर यांना समाजकार्य शिकवू नये’

Rajesh Kshirsagar : सज्ञान व्यक्तीला कोणतीही खाजगी जागा विकण्याची, विकत घेण्याचा कायदेशीर हक्क आहे. जयप्रभा स्टुडीओ हि कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरच्या अस्मितेला डाग न लावता जयप्रभा स्टुडीओ (Jayaprabha Studio) शासन ताब्यात येण्यासाठी फक्त आणि फक्त  राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे. पुढील कार्यवाही कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) स्तरावर सुरु आहे. असे असताना राजकीय बदनामी पोटी उट-सूट आरोप करणाऱ्या विद्यमान आमदारांनी शहराच्या विकास कामाबद्दल आपले ज्ञान पाजळावे. विद्यमान आमदारांचा बोलवता धनी कोण हे जनतेला माहित असल्याची, टीका शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण (Sujit Chavan) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, विद्यमान आमदारांनी २४ तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांच्यावर राजकीय बदनामीच्या हेतूने टीका सत्र सुरु केले आहे. दिगवंत आमदारांच्या पश्च्यात शहरातील मुलभूत सोयी सुविधा, नागरी प्रश्न, विकास कामे यांचा साध्य न करू शकल्याने विद्यमान आमदार “कोल्ह्याला द्राक्षे आंबट” या म्हणीप्रमाणे फक्त टीकाटिप्पणी पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून, भल्याभल्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न करूनही छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण करण्याचे काम करता आले न्हवते. मात्र राजेश क्षीरसागर यांनी सर्वांना सोबत घेवून छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण समितीची स्थापना करून त्याद्वारे कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण घडवून आणले. मनात असते तर या समितीचे ते अध्यक्ष झाले असते परंतु हा मान त्यांनी कोल्हापूरच्या तत्कालीन महापौरांना दिला.
कोल्हापूरच्या अस्मितेत भ्रष्टाचार करण्याचा साधा विचारही शिवभक्त, कडवट शिवसैनिक म्हणून राजेश क्षीरसागर करणार नाहीत. या कामात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या विद्यमान आमदारांची यातून विकृती दिसून येत आहे. एखादा डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करण्याचा विडा उचलून लोकांचे जीव घेत असेल तर त्याला धडा शिकवायचे बाळकडू खुद्द शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिले आहे. विद्यमान आमदारांच्या माहितीसाठी लवकरच या डॉक्टरांच्या त्रासाला बळी पडलेल्या नातेवाईकांची भेट घडवून आणून देवू मग विद्यमान आमदार लोकांना न्याय देण्यासाठी विधानभवनात आवाज उठवतील कि पैशाच्या मोहापाई खुनी डॉक्टरला पाठबळ देतील? हेही विद्यमान आमदारांनी जाहीर करावे.
कोल्हापूर हे फुटबॉल प्रेमी शहर आहे अशा शहरात खेळाडूंच्या सरावासाठी तीन टर्फ तयार करण्यात आले आहेत याचा फायदा हजारो फुटबॉल खेळाडूंना होताना दिसत आहे. यासह श्री.राजेश क्षीरसागर यांच्यामाध्यमातून शहरातील प्रत्येक बाग, उद्यानात ओपन जिम बसविण्यात आली आहे. याचा फायदा खासकरून महिलांना होताना दिसत आहे. या ओपन जिम बद्दलचे कौतुकास्पद मत राज्याच्या अर्थसंकल्पात नोंदविले गेले आहे. याचा किमान अभ्यास विद्यमान आमदारांनी करणे गरजेचे होते. पण, फक्त आणि फक्त बिनबुडाची टीका करायची म्हणून स्वत:कडून होवू न शकणाऱ्या टर्फ आणि ओपन जिम सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर टीका केली जात आहे. एखादा ठेकेदार भ्रष्टाचार करून शासनाचे पैसे लुबाडण्याचे काम करत असेल तर त्याला लगाम घालण्यासाठी वाघाचा पंजा मारावाच लागतो. कोणीही उठेल आणि भ्रष्टाचार करून जनतेची फसवणूक करायची आणि लोकप्रतिनिधीनी त्याकडे दुर्लक्ष करावे, अशी श्री.क्षीरसागर यांच्या कामाची पद्धत नाही. ठेकेदारांवर वचक ठेवून पारदर्शी आणि दर्जेदार काम करून घेण्याकडे राजेक्ष क्षीरसागर यांचा कल असून, विद्यमान आमदारांनी त्या ठेकेदाराकडून देण्यात आलेल्या जाहीर माफी नाम्याचे वाचन करावे, मगच आरोप करावेत.
एकीकडे २०१९, २०२१ ची पूरस्थिती, कोरोना कालावधी यात जनतेची काळजी कुटुंबाचा प्रमुख या नात्याने घेण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. पण, कोरोना काळात घराच्या बाहेर “नागरिकांना प्रवेश बंदी” चा बोर्ड लावणारे राजेश क्षीरसागर यांच्या समाजकार्याकडे डोळे बंद करून बघतात. दिगवंत आमदारांच्या पश्च्यात निवडणुकीत श्री.राजेश क्षीरसागर यांनी पक्षआदेश मानून विद्यमान आमदारांसाठी जीवाच रान करून निवडून आणले पण “एहसान फरामोस” होवून कर्तुत्वहीन विद्यमान आमदार जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि वरिष्ठ नेत्याचे लांगूलचालन करत वैफल्यग्रस्त टीका करत सुटल्या आहेत. कोल्हापूरच्या विकासाचा ध्यास कोणी घेतला आहे हे सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे साहेबांकडून राजेश क्षीरसागर यांनी मंजूर करून घेतलेल्या निधीतून दिसून येते. कित्तेक वर्षे दुरावस्था झालेला विद्यमान आमदारांच्या संपर्क कार्यालयाजवळील रस्ता राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून झाला यावरून विकासाच्या गप्पा मारणे कितपत योग्य आहे याचे   आत्मपरीक्षण विद्यमान आमदारांनी करावे, असाही सल्ला या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला.