Pune | ‘आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे निर्णय होतात ते सर्व कुटुंबाच्या विचाराने घेतले जातात’

Pune – बारामती (Baramati) मध्ये राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा (Namo Employment Fair) आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे निमंत्रण अद्याप मला मिळाले नाही आहे. जर निमंत्रण मिळाले तर मी नक्की कार्यक्रमाला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसारमाध्यमांशी (Pune) बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,नमो रोजगार मेळावा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र निमंत्रण मिळालं नाही पण बोलवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला जाणार असल्याचं सुळे यांनी म्हटले आहे.

पुढे सुळे म्हणाल्या की, या रोजगार मेळाव्याचं आमंत्रण मला अजून आलं नाही आहे. मात्र या कार्यक्रमाला बोलवलं तर मी नक्की जाणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे. या परिसरातील मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की, मी त्यांचं स्वागत करावं आणि अतिथि देवो भवं, हे आधीपासून शिकवलं गेलं आहे. या विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेत आतापर्यंत अनेक दिग्गज येऊन गेले. शरद पवार साहेबांच्या आमंत्रणानेच हे लोक इथे आले. त्यामुळे बोलवलं तर मी नक्की जाईन असे सुळे म्हणाल्या आहेत.

यावर सविस्तर बोलताना सुळे म्हणाल्या की,आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे निर्णय होतात ते सर्व कुटुंबाच्या विचाराने घेतले जातात. माझे लग्न ठरले तेव्हा काका बापूसाहेब पवार सर्वच विधीत सहभागी होते, माझे कन्यादान प्रताप पवारांनी केले, लग्नाचे कार्ड अप्पासाहेब पवारांच्या नावाने गेले. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय होतात, मलाही राजकारणात येण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली त्यातून निर्णय झाला. एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असेही सुळे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल