NCP Leader Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतमधील त्यांच्या दोन दिवसीय शिबिराच्या समारोपाच्या भाषणात शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करत पोलखोल केली. शरद पवार यांनीच राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडल्याचं सांगत अजित पवारांनी भांडाफोड केला आहे.
या सर्व आरोपांवर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावरच तुम्ही बोलता,बोलताना जरा मर्यादा बाळगा. साहेबांबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. तसेच अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर बोलाव हे कलयुग आहे, अशी टीका आव्हाड यांनी अजित पवारांवर केली.
तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचा निर्माता हा शरद पवारच हे अख्या जगाला माहिती आहेत. बापाची चप्पल पायात आली म्हणुन बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. शरद पवार यांचं पोट बाहेर आलं असेल तर तुम्ही कुठले बॉडी बिल्डर आहात, बालिश भाषण करता, असा टोलाही आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.
खरं तर यांनाच (अजित पवार) पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता. पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते. म्हणून शरद पवार यांचा राजीनामा यांना हवा होता, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी