पुण्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ? अजित पवारांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या( Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रकाशित झाला. त्यानंतर पुण्यात आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. पुण्यात आता खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधेच असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रारूप आरखडा जाहीर होण्याआधी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता आपली भूमिका बदल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress party ) आपला सूर बदलला आहे. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी समोर मांडणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (prashant Jagatap )यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली आहे.

त्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्ग्ज नेते अजित पवार यांनी दंड थोपटले असून ते शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बैठक घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सध्या पुणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहर नेतृत्वान स्वबळाची तयारी केली सुरू केल्याने आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) ओळख आहे. पुणे महापालिकेत गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल 34 ग्रामपंचायंतीचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या गावांचा समावेश पालिकेत केल्यानं त्यांच्या विकासाची जबाबदारी पुणे महापालिकेवर आलेली आहे. यामध्ये