शमीच्या सात विकेट! न्यूझीलंडला हरवत भारत चौथ्यांदा पोहोचला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात

IND vs NZ Semi Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडे विश्वचषक २०२३चा पहला उपांत्य सामना पार पडला. या चित्तथरारक सामन्यात यजमानांनी ७० धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे सामना विजयाचे शिल्पकार राहिले.

भारताच्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून डॅरी मिचेलने ११९ चेंडूत १३४ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ७ षटकार आणि ९ चौकार मारले. त न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. कर्णधार केन विलियमसनने ६९ धावांची चिवट खेळी केली होती. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उत्कृष्ट प्रदर्शन केले. शमीने ९.५ षटकात ५७ धावा देत ७ विकेट्स काढल्या. परिणामी ४८.५ षटकात ३२७ धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला.

तत्पूर्वी भारतीय संघाकडून रनमशीन विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केल्या. ११३ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने विराटने ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ७० चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकार मारत १०५ धावा फटकावल्या. तर शुबमन गिल (८० धावा) आणि रोहित शर्मा (४७ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

या विजयासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पराभवाचा वचपा काढला आहे. २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले होते.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…